Surprise Me!

Pune Koregaon Park bomb-blast

2021-04-28 119 Dailymotion

पुणे - पुणे शहरावर दहशतवादी हल्ला झाला आहे. अत्यंत अलिशान लोकवस्तीच्या कोरेगाव पार्क भागाला दहशतवाद्यांनी लक्ष्य बनविले आहे. तेथील ओ हॉटेलजवळच्या प्रसिद्ध जर्मन बेकरीमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास भीषण बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे. या बॉम्बस्फोटातील बळींची संख्या दहा झाली असून ३३ जण जखमी आहेत. मृतांमध्ये पाच परदेशी नागरीक आहेत. ससून रुग्णालय आणि बुद्राणी रुग्णालयात मृत आणि जखमींना नेण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे.