पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टेंपो व मोटारची धडक होऊन झालेल्या अपघातात, ज्येष्ठ कलाकार आनंद अभ्यंकर यांच्यासह अक्षय पेंडसे आणि पेंडसे यांचा मुलगा प्रत्युष यांचे निधन झाले. बऊर गावानजीक रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.