Surprise Me!

पैल तो गे काऊ कोकताहे : इथे रोज भरते कावळ्याची जत्रा..!!

2021-04-28 356 Dailymotion

लातूर : कावळ्याला लोक जरी अपशकून मानत असले तरी संत ज्ञानेश्वरानी `पैल तो गे काऊ कोकताहे.. शकुन गे माये सांगताहे.` या संतवाणीतून शकून कावळ्याचा गोडवा गायिला आहे. याच पद्धतीने मुरूड (ता. लातूर) येथील विश्वनाथ टी हाऊसचे मालक विश्वनाथ सूर्यवंशी (वय ८५) अनेक वर्षापासून कावळ्यांची नित्य सेवा करत आहेत. पहाटे येऊन हजारो कावळ्यासाठी पुरी व भजी तयार करून त्याचे वाटप करतात. आता लॉकडाऊनच्या काळातही खास कावळ्यासाठी हॉटेल उघडून त्यांना भजी देत आहेत. अनेक वर्षापासून कावळे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेळेवर येतात. त्यांची वेळ सूर्यवंशी कधीची चुकवली नाही. कावळा वेळ पाळतोच. त्यासोबत पुरीचा एक तुकडा किंवा भजा तोंडात घेऊन एकदा उडाल्यानंतर कावळा परत येत नाही, असा कावळ्याचा एक वेगळा गुण श्री. सूर्यवंशी सांगतात. एकीकडे पिंडाला शिवण्यासाठी लोक कावळ्याची तासन् तास प्रतीक्षा करतात. इथे मात्र रोजच कावळ्याची जत्रा भरते.
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews
--------
(व्हिडीओ : विकास गाढवे.)