नवापूर : चेडापाडा (ता. नवापूर) येथे आजपासून नरेगा अंतर्गत गाळ काढण्याचे काम सुरू झाले. या कामावर ३३९ मजूर काम करीत आहेत. लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाल्यामुळे आर्थिक ताणाताण कमी होणार आहे. गावातच रोजगार मिळाल्यामुळे शहरात येण्याचे प्रमाण कमी होणार आहे.