Pune : शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढली
Pune (आकुर्डी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून यंदाही गणरायाच्या आगमनाची तयारी मूर्तीकारांमध्ये जोरदार सुरू झाली आहे. यावर्षी शाडू मातीच्या मूर्तींची मागणी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करता येईल व पर्यावरणाचे संवर्धन होईल अशा पद्धतीने कमी उंचीच्या मूर्ती यावर्षी बनविण्याचे काम जोरात सुरू आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, ऑनलाइन पद्धतीने गणरायाच्या मूर्तींचे बुकिंग या वर्षी मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.
व्हिडिओ - रुचिका भोंडवे
#ecofriendly #ganeshidol #pune