Fulsawangi (Yavatmal) : Helicopter बनविणार्या Fulsawangi च्या रँचोचा (शेख इस्माईल उर्फ मुन्नाचा) मृत्यू
Trial दरम्यान पंख्याने केला घात; 15th August ला करणार होता लाँचिंग
Yavatmal : आठवी शिकलेल्या रँचोचे गगणाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी त्याने दोन वर्षे कठोर परिश्रम करून helicopter बनविले. परंतु, trial घेताना मागील बाजूचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर येऊन आदळला आणि मुख्य पंखा रँचोच्या डोक्यात घुसला. बघता बघता रँचोचे प्राणपाखरू उडाले आणि त्याचे स्वप्नही हवेतच विरले.
ही घटना महागाव तालुक्यातील Fulsawangi येथे मंगळवारी (ता. 10) च्या रात्री घडली. Fulsawangi येथील पत्रेकारागिर शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम (वय 24) याने एक helicopter बनविले होते. तर, मागील दोन वर्षांपासून इस्माईल उर्फ मुन्नाने helicopter बनविण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. हळूहळू त्याचे स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसत होते. इस्माईल हा वेल्डिंग कारागिर होता. त्याला एक भाऊ व एक बहीण असून मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डिंगची कामे करतो. तर वडील वृद्ध असल्याने घरीच असतात. इस्माईल हा शेख इब्राहिम यांचा धाकटा मुलगा होता. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. इस्माईल हा पत्रेकारागिर असल्याने तो अलमारी, कुलर अशी विविध उपकरणे बनवायचा. त्याचे शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झालेले होते. एक दिवस त्याला चक्क helicopter बनविण्याची कल्पना सुचली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने helicopter तयार करण्यास सुरूवात केली. हळूहळू helicopter साठी लागणारा एक एक सुटा भाग तो तयार करीत होता. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर बुधवारी (ता. 11) त्याचे स्वप्न सकार होणार होते. मंगळवार (ता. दहा) च्या रात्री त्याने बनविलेल्या helicoper ची trial घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर engine सुरू केले. इंजिन 750 अॅम्पियरचे होते. सर्व व्यवस्थित सुरू होते. पण, अचानक helicopter चा मागचा fan तुटला व तो मुख्य fan ला येऊन धडकला आणि इस्माईलच्या डोक्याला लागलं. पाहता पाहता इस्माईलचा जागीच मृत्यू झाला. त्याचे स्वप्न भंग झाले.
एक दिवस त्याला आपल्या गावाचे नाव जगभर पोहोचवायचे होते. त्याचा हा संकल्पही अर्धवटच राहिला.
राजकुमार भीतकर : सकाळ वृत्तसेवा
#helicopter #fulsawangi #Yavatmal