शिर्ला (अकोला)
पाण्याची पातळी उन्हाळ्यात टिकविण्यासाठी सुवर्ण नदीपात्रालगतच्या २०० शेतकºयांनी एकत्रित येऊन स्वत:च्या वर्गणीतून सुमारे ३ कि. मी. क्षेत्रात वनराई सुवर्ण बंधारे घातले.
पातूर तहसीलदार राजेश वझिरे, पं.स. गटविकास अधिकारी शेखर शेलार, सरपंच रिता संजय सिरसाट यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी तहसीलदार राजेश वझिरे म्हणाले, की सुवर्ण नदीवर बंधारे निर्मितीसाठी २०० शेतकरी एकत्रित आले.