गडचिरोली : ५०० व १००० रूपयांच्या नोटांवर बंदी आणल्याने अनेक उद्योग अडचणीत आले असले तरी बांधकाम व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे. गडचिरोली शहरात तसेच ग्रामीण भागातही शासकीय तसेच खासगी बांधकाम मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. या माध्यमातून स्थानिक नागरिकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.