कोल्हापूर : सप्तरंगी फुलांची आरास, इंद्रधनुषी विद्यूत रोषणाईने झळाळून निघालेले मंदिर, मराठमोळ्या वाद्यांना लाभलेली दाक्षिणात्य संगीताची साथ, पवित्रानुभूती देणारे मंत्रोच्चार, तीन पीठाधीशांचे आर्शिवचन, अंबा माता की जय चा गजर, फुलांचा अखंड वर्षाव आणि महाआरतीने करवीर निवासिनी जगतजननी अंबाबाईला सोमवारी सुवर्णपालखी अर्पण करण्यात आली.