वाशिम - विठ्ठल भक्तीचे वेड लागलेले कारंजा तालुक्यातील काकडशीवणी येथील तुळशीराम वामन सावरकर गत ३६ वर्षांपासून अविरत पायी पंढरपूर वारी करताहेत. २६ जून रोजी ते चालत पंढरपूरकडे रवाना झाले . जेथे मुक्काम होईल तेथे तुळशीराम राष्ट्रसंताचे विचार भजनातून मांडताहेत.