Surprise Me!

उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणाऱ्या शिवसैनिकाच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

2021-12-26 258 Dailymotion

उद्धव ठाकरेंवर उपचार सुरू असताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या. अशाच एका कट्टर शिवसेना कार्यकर्त्याने उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला साकडं घालण्यासाठी बीड ते तिरूपतीपर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता. बीडच्या सुमंत रुईकर यांनी हे साकडं घातलं होतं. पण दुर्दैवाने तिरुपतीला जाण्याचा त्यांचा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही. तिरुपतीला पोहोचण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या उपचारांना त्यांच्या शरीराने साथ दिली नाही. वाटेतच त्यांचं दुर्दैवी निधन झालं.

#UddhavThackrey #Shivsena #BEED #sumantruikar