मराठवाड्यासाठी आणि तिथल्या जनतेसाठी आजचा दिवस मोठा रंगतदार ठरणार आहे. कारण आज मराठवाड्यात तीन युवराजांची एन्ट्री होणार आहे. त्यातले दोन तर औरन्गाबाद जिल्ह्यातील कृषिमंत्र्यांचं शहर असणाऱ्या सिल्लोडमध्ये येणार आहेत. तर तिसरे युवराज नांदेडमध्ये दाखल होणार आहेत.