Surprise Me!

गुजरात सरकारच्या शपथविधीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, शिंदे सोहळ्याला जाणार?

2022-12-10 577 Dailymotion

"गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय झाल्यानंतर आता सत्तास्थापनेला वेग आला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांना अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
एनडीएचा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधीचं निमंत्रण मिळालं आहे. मातोश्रीऐवजी आता ठाण्यातून येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शपथविधीला बोलावण्यात आलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाबाबत गुजरात सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे, याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुजरात सरकारकडून खास आमंत्रित करण्यात आलं आहे.

#gujaratelections2022 #eknathshinde #bjp #chandrakantpatil #ink #hwnewsmarathi