Surprise Me!

कोल्हापुरी चप्पल कशी बनते पाहण्यास प्राडाची टीम इटलीतून कोल्हापुरात आली

2025-07-15 3 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील अस्सल कोल्हापुरी चप्पलच्या बाबत वाद सुरू असलेला पाहायला मिळाला. इटालियन फॅशन ब्रॅण्ड प्राडाने कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून आपल्या फॅशन शोमध्ये प्रदर्शन केले. यानंतर ती चप्पल कोल्हापुरी चप्पलची नक्कल असून कोल्हापुरला आणि भारताला त्याचा सन्मान देणे गरजेचे आहे असे मत मांडण्यात आले. या वादविवादानंतर प्राडाच्या सदस्यांनी मंगळवारी कोल्हापुरातील चप्पल कारागिरांनी भेट घेत घेतली. यावेळी कोल्हापुरी चप्पल कशी तयार होते याची माहिती या टीमने घेतली.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #kolhapurichappals #prada