Surprise Me!

मद्यधुंद निलंबित कर्मचाऱ्याचा शिर्डी साई मंदिर परिसरात धुडगूस; कॅमेरासमोर मागितली माफी

2025-07-25 7 Dailymotion

शिर्डी : साईबाबा मंदिर हे जगभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान मानलं जातं. अशा पवित्र आणि शिस्तबद्ध परिसरात एका निलंबित कर्मचाऱ्यानं दारुच्या नशेत धुडगूस घातला. साई संस्थानचा कर्मचारी हेमंत शिरसाट हा गेल्या काही महिन्यांपासून निलंबित होता. त्याच्यावर आधीही काही शिस्तभंगाचे आरोप होते. मात्र गुरुवारी त्यानं पुन्हा एकदा धक्कादायक कृत्य केलं. हेमंत शिरसाट हा मद्यपान करून मंदिराच्या महाद्वार क्रमांक चार इथं आला. तिथं आल्यावर त्यानं तिथं आरडाओरडा करत धुडगूस घालू लातला. त्याच्या वागणुकीमुळं परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच ताब्यात घेत  मंदिर परिसराबाहेर काढलं. त्यानंतर साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. या सर्व प्रकारानंतर माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यानं कॅमेऱ्यासमोरच दारू पिऊस धुडगूस घातल्याची कबुली दिली.