Surprise Me!

टोमॅटो शेतकरी संकटात, टोमॅटो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

2025-08-11 20 Dailymotion

पुणे: पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी टोमॅटोची लागवड करीत असून, सध्या बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत पाहायला मिळत आहेत. टोमॅटोला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या टोमॅटो बाजारात मोठ्या प्रमाणावर येत असून, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी हा चिंतेत आला असून, उत्पादनाचा खर्च जास्त असून मजुरी, खते, पाणी आणि वाहतूक या सगळ्यांवर मोठा खर्च शेतकऱ्यांकडून होत आहे. पण शेवटी शेतकऱ्याला मिळणारा दर हा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत शिरूर तालुक्यातील शेतकरी सदाशिव बांधल यांनी सांगितले की, मागच्या वेळेसदेखील टोमॅटोला बाजारभाव नव्हता आणि आता थोड फार भाव आहे. ग्रामीण भागात कमी किमतीने टोमॅटो घ्यायचा आणि शहरात जास्त किमतीने टोमॅटो हा विकला जात आहे. आमचं म्हणणं आहे की, आम्हाला थेट शहरात जाऊन टोमॅटो विकण्याची परवानगी देण्यात यावी. आम्ही खूप मेहनत घेऊन टोमॅटोचं पीक घेत आहोत, मात्र आम्हाला किंमत मिळत नाहीये. जे कष्ट करत आहोत, त्याच्या मोबदल्यात जे मिळालं पाहिजे ते मिळत नसल्याने आम्ही शेतकरी संकटात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.