Surprise Me!

अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, पाहा व्हिडिओ

2025-08-12 9 Dailymotion

पुणे : अंगारकी चतुर्थी हा श्रीगणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. त्यात आज श्रावण महिन्यातल्या अंगारकी! भाविकांमध्ये उत्साह दिसला नाही तरच नवल! मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हणतात. अंगारकी आणि संकष्टी (Angarki Chaturthi 2025) दिवशी गणपतीची केलेली आराधना विशेष पुण्यप्राप्ती करुन देते, अशी बाप्पाच्या भक्तांची श्रद्धा आहे. आज अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (Dagdusheth Halwai Ganpati) दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. पहाटे तीन वाजता दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. यानंतर पहाटे चार ते सहा या वेळात प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी आपली गायन सेवा बाप्पासमोर सादर केली. यावेळी त्यांनी विविध भक्ती गीते सादर केली. तर अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिर तसंच मंदिर परिसरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर भाविकांच्या गर्दीमुळं परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.