Surprise Me!

वाद निर्माण होतील असे देखावे करू नका, विसर्जन मिरवणुकीबाबत 25 ऑगस्टला निर्णय; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

2025-08-19 1 Dailymotion

पुणे : येत्या 27 तारखेला गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, पुणे शहराचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक हे गर्दी करत असतात. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीबाबत वाद सुरू असून, मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या आधी काही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या वादाबाबत येत्या 25 तारखेला अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे गणेशमंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच शहरातील जवळपास 400 गणेशमंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.  

यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "यावर्षी गणपती उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सांस्कृतिक मंत्री पुण्यात उपस्थित राहणार आहेत. पोलीस विभागाकडून प्रशासनाच्या सर्व विभागातील लोकांशी चर्चा सुरू आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सव निर्बंध मुक्त केला आहे. पावसाचा काळ आहे. शॉर्ट सर्किटसारख्या घटना घडू नये याची दक्षता गणेशमंडळांनी घ्यावी. तसेच असे देखावे बनवू नका ज्यामुळे वाद निर्माण होतील. गणेशोत्सवात गणेश मंडळांकडे स्वयंसेवक असावे. कोणीही दारूचे सेवन अवैधरित्या करू नका आणि ड्राय डेच्या दिवशी दारू पिऊन कुणी मंडळात जाणार नाही याची देखील दक्षता घ्यावी."